Ad will apear here
Next
वीरगळ संवर्धनामुळे ‘किकली लाइव्ह’

किकली (सातारा) : राज्याचा पुरातत्त्व विभाग आणि सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे स्वातंत्र्यदिनी वीरगळ संवर्धनाची संयुक्त मोहीम राबवण्यात आली. वीरगळ संवर्धनाच्या या उपक्रमामुळे सातारा जिल्ह्यातील किकली या गावात एका वेगळ्याच उत्साहाचे ‘लाइव्हली’ वातावरण होते.

सातारा जिल्ह्यातील चंदन आणि वंदन या किल्ल्यांच्या पायथ्याशी असलेल्या किकली गावात प्राचीन हेमाडपंती भैरव मंदिर आहे. गावातील ग्रामपंचायतीसमोरील वडा जवळ विविध प्रकारचे वीरगळ मातीत गाडले गेले होते. राज्याच्या पुरातत्त्व विभागाने भैरवनाथ मंदिरासोबत वीरगळांचेही संरक्षण केले आहे. 

पुरातत्त्व विभागाचे पुणे विभागाचे संचालक विलास वाहने यांनी याची माहिती दिली आणि संयुक्त मोहीम आखली गेली. सह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रमिक गोजमगुंडे यांच्या नेतृत्वाखाली मोहीम राबवण्यात आली. मोहिमेदरम्यान भैरवनाथ मंदिर परिसराची व गावातील इतर ठिकाणी पडलेल्या वीरगळांची पाहणी करण्यात आली. ग्रामसभेत सरपंच दीपक बाबर यांनी वीरगळ संरक्षण-संवर्धनाबाबतची माहिती गावातील लोकांना दिली. कार्याध्यक्ष प्रवीण शिर्के यांनी गावातील तरुणांना वीरगळांचे महत्त्व समजावून सांगितले. राज बालशेटवार, गौरव शेवाळे व गणेश रघुवीर यांनी गावातील इतर ठिकाणे, मंदिरे, पाडे, चौक येथील वीरगळांची पाहणी करून नोंद केली. ग्रामपंचायतीसमोरील पाड्यांजवळील जमिनीत अर्धे गाडले गेलेले वीरगळ काळजीपूर्वक बाहेर काढण्यात आले व ते स्वच्छ करण्यात आले. ट्रॅक्टरने वीरगळ भैरवनाथ मंदिर परिसरात नेण्यात आले. सर्व वीरगळांची सविस्तर माहिती घेऊन त्यांची नोंद करण्यात आली.

या मोहिमेत महेंद्र जाधव, प्रवीण शिर्के, गौरव शेवाळे, राज बालशेटवार, अमित जाचक, रोहित देशमुख, कुमार गुरव, गणेश कोकरे, तुषार बाबर, गणेश रघुवीर, सूर्यकांत चव्हाण, अतीशभाऊ व इतर शिवप्रेमी सहभागी झाले होते. मुंबई, पुणे, कोल्हापूर व सातारा या भागांतून मोठ्या संख्येने शिवप्रेमींनी या मोहिमेत सहभाग घेतला होता, अशी माहिती सह्याद्री प्रतिष्ठानचे दुर्गसंवर्धन विभाग अध्यक्ष गणेश रघुवीर यांनी दिली. राज्य पुरातत्त्व विभागाचे (पुणे) संचालक विलास वाहने आणि किकली गावाचे सरपंच दिलीप बाबर यांचे रघुवीर यांनी विशेष आभार मानले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/LZEUBF
Similar Posts
दुर्गदिनानिमित्त दीपोत्सव साजरा पुणे : सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्रच्या वतीने दरवर्षी १ मे हा दिवस दुर्गदिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने मध्यरात्री, म्हणजेच ३० एप्रिलला रात्री किल्ल्यावर जाऊन दीपोत्सव साजरा केला जातो. यावर्षी दीपोत्सवासाठी पुणे जिल्ह्यातील कोरीगड किल्ल्याची निवड करण्यात आली होती. ३० एप्रिलला दुपारी
कृष्णा कारखाना कार्यस्थळावर वृक्षारोपण रेठरे बुद्रुक (सातारा) : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर कराडचे उपविभागीय अधिकारी हिंमतराव खराडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या चार कोटी वृक्षलागवड योजनेअंतर्गत आयोजित या कार्यक्रमाला कराड तालुका कृषी अधिकारी दत्तत्रय खरात, वाळवा तालुका उपविभागीय
‘जयवंतराव भोसले म्हणजे एक कुशल नेतृत्व’ शिवनगर (ता. कराड, जि. सातारा) : ‘दूरदृष्टी असणाऱ्या जयवंतराव भोसले यांनी स्त्री शिक्षणास प्रोत्साहन दिले. त्यामुळेच माझ्यासारख्या सामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबातील मुलीला डॉक्टर होता आले,’ असे उद्गार कविभूषण डॉ. जयश्री श्रेणिक पाटील यांनी काढले. सहकारमहर्षी जयवंतराव भोसले उर्फ अप्पासाहेब यांच्या चतुर्थ
प्रकाश पिसाळ विश्वनायक राष्ट्रीय प्रेरणा पुरस्काराने सन्मानित कराड (सातारा) : भारत सरकार संलग्न क्रांती ग्रामविकास संस्थेमार्फत दिला जाणारा विश्वनायक राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार दैनिक ऐक्यचे सिनीअर मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह व साप्ताहिक स्वप्ननगरीचे कार्यकारी संपादक प्रकाश पिसाळ यांना राष्ट्रीय स्तरावर समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबददल देण्यात आला

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language